मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुणे महानगरपालिका भरती २०२४ : PMC CMYKPY Bharti 2024
(PMC CMYKPY Bharti 2024) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती 2024
पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतून पुणे महानगरपालिकेत 681 विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ही एक उत्तम संधी असून, 12वी पास, ITI, डिप्लोमा, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांना अर्ज करता येईल.
पदाची माहिती:
- पदाचे नाव: विविध युवा प्रशिक्षण पदे
- एकूण जागा: 681
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवारांनी 12वी/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 18 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण:
- पुणे महानगरपालिका, पुणे
फी तपशील:
- अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024