स्टाफ सिलेक्शन कमिशन पोस्ट्स फेज 3 भरती 2025 - SSC Selection Posts Bharti 2025
स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्ट्स (फेज-XIII) भरती २०२५ - SSC Selection Posts Recruitment 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC ) भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमधील रिक्त असलेल्या 'सिलेक्शन पोस्ट्स' (निवड पदे) भरण्यासाठी " सिलेक्शन पोस्ट्स (फेज-XIII) परीक्षा २०२५ " आयोजित करत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे गट 'ब' (अराजपत्रित) आणि गट 'क' मधील विविध प्रकारच्या एकूण २४२३ जागा भरण्यात येणार आहेत . ज्या उमेदवारांकडे १०वी, १२वी किंवा पदवी यासारखी विविध शैक्षणिक पात्रता आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदांमध्ये कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर अशा अनेक प्रकारच्या पदांचा समावेश आहे. ही पदे भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये असल्याने, देशभरात कुठेही नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जागा तपशील ➤ कॅन्टी…