भारतीय लष्करी अकादमी (IMA), भारतीय नौदल अकादमी (INA), भारतीय हवाई दल अकादमी (AFA)/ (OTA) मध्ये यूपीएससी सीडीएस 2 परीक्षा 2025/ UPSC CDS II Bharti 2025
यूपीएससी सीडीएस 2 भरती 2025 - UPSC CDS II Exam 2025
संयुक्त संरक्षण सेवा सीडीएस २ परीक्षा २०२५ - UPSC CDS II Bharti 2025 केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) दरवर्षी संयुक्त संरक्षण सेवा ( Combined Defence Services - CDS ) परीक्षेचे आयोजन करते. या परीक्षेमार्फत भारतीय लष्करी अकादमी (IMA), भारतीय नौदल अकादमी (INA), भारतीय हवाई दल अकादमी (AFA) आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA) मध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी तरुण व उत्साही उमेदवारांची भरती केली जाते. ही परीक्षा देशातील प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असून, भारतीय संरक्षण दलात सेवा करण्याची आणि देशाच्या सुरक्षेत योगदान देण्याची एक सुवर्णसंधी प्रदान करते. जाहिरात क्रमांक 11/2025.CDS-II अंतर्गत, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), २०२५ साठी एकूण ४५३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया संरक्षण दलात एक उज्ज्वल कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर युवक-युवतींसाठी एक आव्हान आणि संधी आहे. जागा तपशील पद संख्या भारतीय भूदल (मिलिटरी) अकादमी (IMA), डेहराडून 100 भारतीय नेव्हल अकादमी (INA), एझीमाला 26 हवाई दल अकादमी (AFA), हैदराबाद 32 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (OTA), चेन्नई (पुरुष) 276 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲक…