स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025 - SSC MTS Bharti 2025

एसएससी एमटीएस 1000+ जागांसाठी मेगा भरती २०२५


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC/ CBN) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये एकूण १०७५ पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीची जाहिरात क्रमांक E/15/2025-C-2 असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.


स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025 - SSC MTS Bharti 2025

जागा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (नॉन-टेक्निकल)नंतर कळवले जाईल
2हवालदार (CBIC & CBN)१०७५
एकूण१०७५+

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 आणि 2: १० वी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य असावा.

वयोमर्यादा

  • • उमेदवाराचे वय ०१ ऑगस्ट २०२५ रोजी खालीलप्रमाणे असावे:
  • MTS आणि हवालदार (CBN) पदासाठी: १८ ते २५ वर्षे.
  • हवालदार (CBIC) पदासाठी: १८ ते २७ वर्षे.
  • सवलत: SC/ST प्रवर्ग ०५ वर्षे आणि OBC प्रवर्ग ०३ वर्षे सवलत लागू राहील.

वेतनश्रेणी

  • • निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन (Pay Level-1) आणि इतर भत्ते दिले जातील.

कामाची जबाबदारी

  • MTS: कार्यालयाची स्वच्छता, कागदपत्रे एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणे, दैनंदिन कार्यालयीन कामात वरिष्ठांना मदत करणे इत्यादी.
  • हवालदार: सुरक्षा आणि पहारा देणे, गेटकीपिंग, आणि वरिष्ठांनी सोपवलेली इतर कामे करणे.

निवड प्रक्रिया

  • • उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (Computer Based Examination - CBE) द्वारे केली जाईल.
  • • हवालदार पदासाठी, संगणक आधारित परीक्षेनंतर शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST) आयोजित केली जाईल.

अर्ज शुल्क

  • General/OBC: ₹१००/-
  • SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिला उमेदवार: कोणतेही शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया

  • • अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • • उमेदवारांनी SSC च्या नवीन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट द्यावी.
  • • वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज भरावा.
  • • अर्जात अचूक माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे (फोटो, सही) अपलोड करावीत.
  • • अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे.
  • • अर्ज अंतिमरित्या सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जुलै २०२५ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
  • संगणक आधारित परीक्षा (CBT) अंदाजित तारीख: २० सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२५

महत्त्वाच्या सूचना

  • ➤ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • ➤ अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा अपूर्ण असल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • ➤ शेवट तारीख च्या आत उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा.

नोकरी ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील कोणत्याही राज्यात/केंद्रशासित प्रदेशात केली जाऊ शकते (संपूर्ण भारत).


महत्त्वाच्या लिंक