महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 2026 - MH SET 2026
MH SET 2026 म्हणजेच सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन व गोवा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.
राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
👉 महत्त्वाची सूचना: SET परीक्षा 26 जुलै 2026 (रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे.
Post Date: 05 जून 2026
Last Update: 05 जून 2026
🔎 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा तपशील - Overview
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET) |
|---|---|
| आयोजक संस्था | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |
| परीक्षा क्रमांक | 41 वी SET परीक्षा |
| परीक्षा दिनांक | 26 जुलै 2026 |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| परीक्षा क्षेत्र | महाराष्ट्र व गोवा राज्य |
| अधिकृत संकेतस्थळ | https://setexam.unipune.ac.in |
📍 परीक्षा केंद्रे - Exam Centers
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) येथे परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
📋 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पात्रता आणि निकष - Eligibility
🎓 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अर्ज प्रक्रिया - Application Process
- अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून भरावा.
- अर्जाची प्रिंट स्वतःकडे जतन करून ठेवावी.
- अर्जाची प्रत SET विभाग किंवा परीक्षा केंद्रावर पाठवू नये.
💰 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा शुल्क - Application Fee
| प्रवर्ग | नियमित शुल्क | विलंब शुल्कासह |
|---|---|---|
| खुला | ₹800/- | ₹1300/- |
| ओबीसी / NT / VJNT / SBC (Non-Creamy Layer), EWS, PwD, SC, ST, तृतीयपंथी, अनाथ | ₹650/- | ₹1150/- |
📅 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाच्या तारखा - Important Dates
- ऑनलाइन अर्ज सुरू: 02 जून 2026 (सकाळी 11:00)
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 16 जून 2026 (सायं. 6:00)
- विलंब शुल्कासह अर्ज: 17 जून 2026 ते 19 जून 2026 (सायं. 6:00 पर्यंत)
- SET परीक्षा दिनांक: 26 जुलै 2026 (रविवार)
📝 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाच्या सूचना - Important Instructions
- परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावे.
- अर्जाची प्रिंट व शुल्क भरल्याचा पुरावा जतन करून ठेवावा.
- पूर्वी SET पात्र झालेल्या उमेदवारांना त्याच विषयात पुन्हा SET परीक्षा देता येणार नाही.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी MH SET परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
🔗 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाचे लिंक - Important Links
❓ महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाचे प्रश्न - FAQ
-
MH SET 2026 परीक्षा 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
-
16 जून 2026 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
-
17 जून 2026 ते 19 जून 2026 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.
-
खुला प्रवर्गासाठी ₹800/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹650/- अर्ज शुल्क आहे.
🔔 या भरती संबंधित पुढील अपडेटसाठी या पेज ला भेट देत रहा: https://www.naukrikendra.com/2026/06/bro-bharti-2026.html