UPSC भरती 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगात 102 जागांसाठी मोठी भरती
जाहिरात प्रसिद्ध: 13 डिसेंबर 2025 | अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत)
UPSC द्वारे वर्ग-1 च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
भरतीचा थोडक्यात तपशील
| जाहिरात क्रमांक | 14/2025 |
|---|---|
| एकूण रिक्त जागा | 102 |
| आयोजक संस्था | Union Public Service Commission (UPSC) |
| अर्जाचे माध्यम | फक्त ऑनलाईन (Online) |
| नोकरीचा दर्जा | केंद्र सरकार (कायमस्वरूपी) |
पदांचे नाव आणि रिक्त जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | उपलब्ध जागा |
|---|---|---|
| 1 | ट्रेड मार्क्स आणि जिओग्राफिकल इंडिकेशन्स परीक्षक (Examiner) | 100 |
| 2 | उप संचालक (परीक्षा सुधारणा) / Deputy Director | 02 |
| एकूण पदसंख्या | 102 | |
आवश्यक शैक्षणिक अहर्ता (Eligibility)
- पद क्र. 1 साठी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (Degree in Law) आणि किमान 02 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
- पद क्र. 2 साठी: संबंधित विषयात (Humanities/Science/Engineering इ.) Ph.D पदवी आणि किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
| वय मर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी) |
पद क्र. 1: खुला/EWS: 30 वर्षे | OBC: 33 वर्षे | SC/ST: 35 वर्षे | PWD: 40 वर्षे (कमाल) पद क्र. 2: OBC: 43 वर्षे | SC: 45 वर्षे पर्यंत सवलत. |
|---|---|
| अर्ज फी |
OPEN / OBC / EWS प्रवर्ग: ₹25/- SC / ST / PWD / सर्व महिला: फी माफ (No Fee) |
निवड पद्धती
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- 1. अर्जांची छाननी (Shortlisting)
- 2. वैयक्तिक मुलाखत (Interview)
- 3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- 4. वैद्यकीय तपासणी (Medical Test)
पगार / वेतनमान
निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) केंद्र सरकारचे आकर्षक वेतन आणि भत्ते मिळतील.
महत्त्वाचे दिनांक (Schedule)
- अर्ज प्रक्रियेची सुरुवात: 13 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: 01 जानेवारी 2026 (संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत)
- मुलाखतीची तारीख: नंतर कळवण्यात येईल.