डीआरडीओ सायंटिस्ट भरती 2025 - DRDO Bharti 2025
संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2025 - DRDO Bharti 2025
थोडक्यात माहिती:
DRDO भरती 2025: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मार्फत सायंटिस्ट ‘F’, ‘E’, ‘D’ आणि ‘C’ या विविध संवर्गातील एकूण 21 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यावश्यक तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देणाऱ्या DRDO मध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून आवश्यक पात्रता व अटी तपासून अर्ज करावा. ही भरती थेट वैज्ञानिक पदांसाठी असून संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

जागा तपशील:
शास्त्रज्ञ ‘F’ | 01 |
शास्त्रज्ञ ‘E’ | 04 |
शास्त्रज्ञ ‘D’ | 04 |
शास्त्रज्ञ ‘C’ | 12 |
एकूण | 21 जागा |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1: (i) प्रथम श्रेणी B.E./B.Tech (नेव्हल आर्किटेक्चर / मरीन / सिव्हिल) (ii) संबंधित क्षेत्रात किमान 13 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र. 2: (i) प्रथम श्रेणी B.E./B.Tech (नेव्हल आर्किटेक्चर / मरीन / सिव्हिल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / मेटलर्जिकल इंजिनिअरिंग / मटेरियल सायन्स / केमिकल) (ii) संबंधित क्षेत्रात किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र. 3: (i) प्रथम श्रेणी B.E./B.Tech (मेकॅनिकल / केमिकल / एअरोस्पेस / एरोनॉटिकल) (ii) संबंधित क्षेत्रात किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र. 4: (i) प्रथम श्रेणी B.E./B.Tech (एअरोस्पेस / एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) किंवा अणुवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) संबंधित क्षेत्रात किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा:
वयोमर्यादा (दि. 09 मे 2025 रोजी अनुशंगाने): पद क्र. 1, 2 व 3: कमाल वयोमर्यादा 50 वर्षे पद क्र. 4: कमाल वयोमर्यादा 40 वर्षे
आरक्षण प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत: अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 5 वर्षांची सूट इतर मागासवर्गीय (OBC): 3 वर्षांची सूट
अर्ज शुल्क:
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹100/- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला: शुल्क माफ आहे
अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
शेवट तारीख | 09 मे 2025 |
नोकरी ठिकाण:
दिल्ली