पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025
पनवेल महानगरपालिका 40 जागांसाठी भरती 2025 जाहीर - Panvel Mahanagarpalika Job 2025
पनवेल महानगरपालिका भरती 2025: पनवेल महानगरपालिका मार्फत पनवेल आरोग्य विभाग मध्ये "आशा स्वयंसेविका" पद भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित आरोग्य केंद्रावर थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. 10वी उत्तीर्ण महिलांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून कुठलीही अर्ज शुल्क नाही.

जागा तपशील
पद | संख्या |
---|---|
आशा स्वयंसेविका | 40 |
शैक्षणिक पात्रता
- • उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्थानिक महिला आणि संबंधित प्रभागातील राहिवासी असणे आवश्यक.
वयोमर्यादा
- • वय 20 ते 25 वर्ष दरम्यान.
वेतनश्रेणी
- • आशा स्वयंसेविका यांना कामानुसार मासिक प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. निश्चित वेतनश्रेणी शासन निर्देशानुसार असेल.
कामाची जबाबदारी
- ✔ प्राथमिक आरोग्य सेवा देणे
- ✔ गरोदर महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करणे
- ✔ लसीकरण मोहिमा राबविणे
- ✔ महिलांचे व किशोरी मुलींचे आरोग्य शिक्षण
- ✔ ग्राम स्तरावरील आरोग्य सर्वेक्षण
- ✔ सरकारी आरोग्य योजनांची माहिती देणे आणि नोंद ठेवणे
निवड प्रक्रिया
- • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा अथवा ऑनलाईन फॉर्म नाही.
अर्ज शुल्क
- • कोणतेही शुल्क नाही. ही भरती पूर्णपणे मोफत आहे.
अर्ज प्रक्रिया
- • उमेदवारांनी संबंधित आरोग्य केंद्रावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्जाचा कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म नाही.
महत्त्वाच्या तारखा
- • मुलाखत कालावधी | 19 मे 2025 ते 30 मे 2025
महत्त्वाच्या सूचना
- ➤ उमेदवारांनी मूळ व झेरॉक्स कागदपत्रे सोबत आणावीत.
- ➤ स्थानिक महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- ➤ कोणतीही मध्यस्थी अथवा शिफारस केल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- ➤ मुलाखतीस वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
पनवेल, रायगड जिल्हा, महाराष्ट्र