📑 Table of Contents ▼
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 - Eklavya Model Residential Schools Bharti 2025
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential Schools - EMRS) अंतर्गत 7267 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण सोसायटीद्वारे केली जाणार आहे. Principal, PGT, TGT, Staff Nurse, Hostel Warden, Accountant, JSA आणि Lab Attendant अशी पदे उपलब्ध असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत) आहे.
EMRS भरती 2025 पदांचा तपशील - Vacancy Details
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | प्राचार्य (Principal) | 225 |
2 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1460 |
3 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 3962 |
4 | महिला स्टाफ नर्स | 550 |
5 | हॉस्टेल वॉर्डन | 635 |
6 | अकाउंटंट | 61 |
7 | ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) | 228 |
8 | लॅब अटेंडंट | 146 |
एकूण जागा | 7267 |
EMRS ESSE 2025 शैक्षणिक पात्रता - Educational Qualification
- प्राचार्य: पदव्युत्तर पदवी, B.Ed/M.Ed, आणि 9 ते 12 वर्षांचा अनुभव.
- PGT: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / M.Sc (IT/Computer Science) / MCA / M.E / M.Tech आणि B.Ed आवश्यक.
- TGT: संबंधित विषयात पदवी व B.Ed.
- महिला स्टाफ नर्स: B.Sc (Nursing) व 2.5 वर्षांचा अनुभव.
- हॉस्टेल वॉर्डन: पदवीधर किंवा NCTE मान्यताप्राप्त संस्थेचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
- अकाउंटंट: B.Com पदवीधर.
- JSA: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- लॅब अटेंडंट: 10वी उत्तीर्ण + लॅब तंत्रज्ञान डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.
आदिवासी विकास मंत्रालय शिक्षक भरती 2025 वयोमर्यादा - Age Limit
- प्राचार्य: 50 वर्षांपर्यंत
- PGT: 40 वर्षांपर्यंत
- TGT, नर्स, वॉर्डन: 35 वर्षांपर्यंत
- अकाउंटंट, JSA, Lab Attendant: 30 वर्षांपर्यंत
- OBC: 3 वर्षे सूट | SC/ST: 5 वर्षे सूट (23 ऑक्टोबर 2025 पर्यंत)
EMRS शिक्षक भरती 2025 अर्ज शुल्क - Application Fee
पदाचे नाव | शुल्क (General/OBC) | SC/ST/PWD/महिला |
---|---|---|
प्राचार्य | ₹2500/- | ₹500/- |
PGT, TGT | ₹2000/- | ₹500/- |
इतर पदे | ₹1000/- | ₹500/- |
EMRS शाळा शिक्षक भरती 2025 निवड प्रक्रिया - Selection Process
- CBT (Computer Based Test)
- Document Verification
- Final Merit List नुसार निवड
EMRS भरती 2025 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा - How to Apply (Online)
- अधिकृत वेबसाइट https://emrs.tribal.gov.in येथे जा.
- “EMRS Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
- तुमची वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती भरा.
- अर्ज शुल्क Online पद्धतीने भरा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
EMRS TGT PGT भरती 2025 महत्त्वाच्या तारखा - Important Dates
- जाहिरात प्रसिद्धी: 20 सप्टेंबर 2025
- अर्ज सुरु: 23 सप्टेंबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)
- परीक्षा दिनांक: नंतर जाहीर होईल.
EMRS ESSE 2025 नोकरी ठिकाण - Job Location
भारतभरातील विविध राज्यांतील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये नियुक्ती केली जाईल.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 महत्त्वाच्या लिंक - Important Links
FAQ – EMRS Bharti 2025 संबंधित सामान्य प्रश्न
- 1. EMRS Bharti 2025 साठी किती पदे जाहीर झाली आहेत?
एकूण 7267 पदांसाठी ही भरती आहे. - 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
23 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत). - 3. ही भरती कोणत्या पद्धतीने होईल?
Computer Based Test आणि दस्तऐवज पडताळणीद्वारे. - 4. अर्जाची पद्धत काय आहे?
अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. - 5. EMRS Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?
शिक्षक पदांसाठी B.Ed, PGT साठी पदव्युत्तर पदवी आवश्यक. - 6. फी किती आहे?
General साठी ₹1000 ते ₹2500 आणि SC/ST साठी ₹500 शुल्क आहे.