केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्राइवर भरती 2025 - CISF Bharti 2025
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1124 नवीन जागांसाठी भरती जाहीर
CISF भरती 2025: संपूर्ण माहिती
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली सुरक्षा संस्था आहे. CISF ने कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांसाठी एकूण 1124 जागा भरण्याची घोषणा केली आहे. ही भरती देशभरातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, शारीरिक प्रमाण आणि चाचणी यांच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना CISF मध्ये काम करण्यासाठी उच्च शारीरिक क्षमतेची आवश्यकता आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वय मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती CISF च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
रिक्त पदांचा तपशील:
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
2 | कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
एकूण | 1124 |
शैक्षणिक पात्रता:
दहावी उत्तीर्ण/ अवजड वाहन (HMV/TV) आणि हलक्या वाहन चालक परवाना
शारीरिक पात्रता निकष:
प्रवर्ग | उंची | छाती |
---|---|---|
सामान्य, SC, OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. (फुगवून 85 सें.मी.) |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. (फुगवून 81 सें.मी.) |
वयोमर्यादा:
उमेदवारांचे वय 21 वर्षे ते 27 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी नेमणूक केली जाईल.
अर्ज शुल्क:
सामान्य आणि OBC प्रवर्गासाठी ₹100/- फी लागू आहे. (उर्वरित फी नाही).
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 03 फेब्रुवारी 2025
- अंतिम मुदत: 04 मार्च 2025
- परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर होईल