भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था पुणे भरती 2025 - IITM Pune Bharti 2025

IITM पुणे भरती 2025 : IITM Pune Bharti 2025


थोडक्यात माहिती:

IITM पुणे भरती 2025: भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक-E, प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I तसेच वैज्ञानिक सहाय्यक अशा एकूण १७८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती IITM पुणे भरती 2025 या अंतर्गत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित पात्रता आणि अटींची पूर्तता करून अर्ज करावा.




इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी भरती 2025 जागा तपशील:

प्रकल्प वैज्ञानिक (E)05
प्रकल्प वैज्ञानिक (III)24
प्रकल्प वैज्ञानिक (II)35
प्रकल्प वैज्ञानिक (I)88
वैज्ञानिक सहाय्यक26
एकूण जागा178

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक १: (i) पदव्युत्तर पदवी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंस्ट्रुमेंटेशन, वातावरणीय विज्ञान, वातावरणीय भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, संगणक विज्ञान, भूभौतिकशास्त्र, समुद्रशास्त्र, भूविज्ञान, हवामान विज्ञान) किंवा ME/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार, यांत्रिक, सिव्हिल, एरोस्पेस, वातावरणीय विज्ञान/भौतिकशास्त्र/हवामानशास्त्र) किंवा समतुल्य पात्रता आवश्यक. (ii) किमान ११ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

पद क्रमांक २: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (भौतिकशास्त्र, इंस्ट्रुमेंटेशन, हवामानशास्त्र, वातावरणीय विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फिजिक्स, समुद्रशास्त्र, गणित, डेटा सायन्स) किंवा 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, डेटा सायन्स) किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. (ii) किमान ७ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

पद क्रमांक ३: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (भौतिकशास्त्र, इंस्ट्रुमेंटेशन, हवामानशास्त्र, वातावरणीय विज्ञान, पर्यावरण विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फिजिक्स, समुद्रशास्त्र, गणित) किंवा 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिकल, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, डेटा सायन्स) किंवा ME/M.Tech (वातावरणीय विज्ञान, हवामान विज्ञान, पृथ्वी विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, पर्यावरण अभियांत्रिकी) किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. (ii) किमान ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

पद क्रमांक ४: 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (भौतिकशास्त्र, इंस्ट्रुमेंटेशन, हवामानशास्त्र, वातावरणीय विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फिजिक्स, गणित, रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान, भूभौतिकशास्त्र, वातावरण व समुद्रशास्त्र, भूविज्ञान, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अवकाश अनुप्रयोग, समुद्रशास्त्र, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान) किंवा 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (एरोनॉटिकल, एरोस्पेस, वातावरणीय भौतिकशास्त्र, वातावरणीय विज्ञान, सिव्हिल, संगणक, संगणक विज्ञान, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पर्यावरण विज्ञान, इंस्ट्रुमेंटेशन, IT, मेकॅनिकल, हवामानशास्त्र) किंवा ME/M.Tech (वातावरणीय विज्ञान, हवामानशास्त्र, डेटा सायन्स, पृथ्वी विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण विज्ञान, गणित, समुद्रशास्त्र, भौतिकशास्त्र) किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. टीप: या पदासाठी अनुभवाचा उल्लेख नाही.

पद क्रमांक ५: 50% गुणांसह B.Sc पदवी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंस्ट्रुमेंटेशन, वातावरणीय विज्ञान, हवामानशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, पर्यावरण विज्ञान, संगणक विज्ञान, भूभौतिकशास्त्र) किंवा 50% गुणांसह पदवी (मास कम्युनिकेशन, संगणक अनुप्रयोग, IT, संगणक विज्ञान, संगणक डिझाईन, ग्राफिक्स, डिझाईन, अ‍ॅनिमेशन) किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. टीप: या पदासाठी अनुभवाची अट नाही.


वयोमर्यादा:

वयोमर्यादा (१५ मे २०२५ रोजी अधारित): (आरक्षणानुसार सवलत: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे)

पद क्रमांक १: ५० वर्षांपर्यंत पद क्रमांक २: ४५ वर्षांपर्यंत पद क्रमांक ३: ४० वर्षांपर्यंत पद क्रमांक ४: ३५ वर्षांपर्यंत पद क्रमांक ५: २८ वर्षांपर्यंत


अर्ज शुल्क:

फी नाही.


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

शेवट तारीख15 मे 2025

नोकरी ठिकाण:

पुणे, महाराष्ट्र


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट